मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसातील ऐतिहासिक सभेला आज 1 वर्ष केले. यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार व शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आज बरोबर एक वर्ष झालं त्या घटनेला, ज्या घटनेची नोंद राज्याच्या राजकीय इतिहासात ठळकपणे झालीच पण विरोधकांच्या स्वप्नांवरही पाणी फेरलं गेलं. ती ऐतिहासिक घटना म्हणजे माझं दैवत आदरणीय साहेबांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली जाहीर सभा आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, साहेब, प्रचंड कष्ट आणि लोकांचं प्रेम या तीन गोष्टी कधीही वेगळ्या करता येणार नाहीत. आजही साहेब त्याच उत्साहात, जोमात काम करताना दिसतात. लोकांमध्ये जातात, त्यांचं दुःख समजून घेतात आणि त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ते लोकांच्या हृदयात आहेत, असं रोहित म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
इयाॅन माॅर्गन-दिनेश कार्तिकची फटकेबाजी; कोलकाताचे हैदराबादसमोर 164 धावांचे लक्ष्य
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं वर्तन त्या पदाला न शोभणारं- राजू शेट्टी
आपले पद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात- चंद्रकांत पाटील
शरद पवारांना ‘या’ वयात बांधावर उतरायला लागत आहे, हेच…; गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका