नागपूर : नागपूरमध्ये विधानसभेचं हिवाळी अधिवेशव सुरु आहे. सभागृहात भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकर आणि गोवंश हत्याबंदीवरुन भाजवर निशाणा साधला आहे.
गोवंश हत्याबंदीचा कायदा सर्व देशात का लागू झाला नाही? माझ्या महाराष्ट्रात माता आणि बाजूला जाऊन खाता?, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भापला टोला लगावला.
गोवंश हत्याबंदीवरुन भाजपची नेमकी भूमिका काय आहे. गोवंश हत्याबंदी संपूर्ण देशात का लागू नाही. रीजिजू आणि पर्रिकर म्हणाले होते की, आमच्या येथे मोठ्या प्रमाणात गोमास खाल्ले जाते. यावर भाजपची भूमिका वेगवेगळी आहे का?, असा सवालही त्यांनी केला आहे.
दरम्यान, सावरकरांवरुन तुम्ही शिवसेनेवर टीका करत आहात. मात्र, तुम्हाला सावरकरांचं सर्व हिंदूत्व मान्य आहे काय?, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
-मनसेच्या ‘या’ एकमेव आमदाराच्या गाडीचा आपघात
-ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांनो सावधान.. अशी होते OTP फसवणूक
-भारताकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा, मालिकेत 1-1 ची बरोबरी
-भाजपच्या ‘या’ खासदाराने दिला भाजपलाच घरचा आहेर; शिवसेनेला मुख्यमंत्रीपद न देणं ही चूक