मुंबई : शितल दामा या महिलेचा गटारात पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी आंदोलन केलं होतं. मात्र हे आंदोलन करत असताना मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या यांना ताब्यात घेतलं आहे. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
याआधी किरीट सोमय्या यांनी ट्विट करत शितल दामा चा परिवाराला न्याय हवा आज दुपारी 12 वाजता घाटकोपर पश्चिम चिराग नगर पोलिस स्टेशन चा बाहेर, शीतल चा परिवार सोबत मी धरणा/ ठिय्या आंदोलन करणार. पोलीसांनी 12 दिवसानंतर ही एफ आय आर FIR ही रजिस्टर केला नाही, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, पोलिसांनी 12 दिवसांनंतर अद्यापही एफआयआर दाखल केला नसल्याचा आरोप यावेळी किरीट सोमय्या यांनी केला होता. महिलेच्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे.
“शितल दामा चा परिवाराला न्याय हवा” आज दुपारी १२ वाजता घाटकोपर पश्चिम चिराग नगर पोलिस स्टेशन चा बाहेर, शीतल चा परिवार सोबत मी धरणा/ ठिय्या आंदोलन करणार. पोलीसांनी १२ दिवसा नंतर ही एफ आय आर FIR ही रजिस्टर केला नाही @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar pic.twitter.com/GNKiQPfMoI
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 15, 2020
महत्वाच्या घडामोडी-
राज्यपालांनी राजकारण करु नये, घटनेच्या चौकटीत राहून काम करावं- संजय राऊत
माझ्याकडे ना घर आहे, ना दार मग…; अमृता
“सांगली शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थती’
‘बाप’ हा सहज वापरला जाणारा शब्द, मी अजित पवारांचा बाप काढलेला नाही- चंद्रकांत पाटील