मुंबई: बापाची पेंड हा सहजपणे वापरला जाणारा शब्द आहे. त्या शब्दाचा मी वापर केला. त्यातून कुणाचाही बाप काढायचा नव्हता. मी कुणाचाही बाप काढला नाही, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केली. चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
आपल्या मराठीत अनेक शब्द सहजपणे वापरले जातात. त्यापैकी बाप हा सुद्धा एक शब्द आहे. तुमच्या बापाची पेंड आहे का? असं आपण सहज म्हणतो. पुणे प्रभाग समितीच्या निवडणुकीच्या संदर्भानं आम्हीही बाप आहोत, असं मी म्हणालो. त्यातून कुणाचाही बाप काढायचा नव्हता. तसा माझा हेतूही नव्हता, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
अजित पवारांचाही बाप काढलेला नाही. हा सहज वापरलेला शब्द आहे. हे यांना कळत नाही का? त्यावरून अंगावर येण्याची गरजच काय?, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी-
शिवार’ खरंच जलयुक्त झाले की फक्त पाण्याऐवजी पैसेच मुरले?- रोहित पवार
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत खुली चौकशी होणार
“आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला तोंड लपवायला जागा ठेवणार नाही”
दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक विजय; राजस्थानवर 13 धावांनी मात