मुंबई: शस्त्रक्रियेनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ‘महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’, अशी पहिली प्रतिक्रीया संजय राऊत यांनी दिली आहे.
तीन पक्ष पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. त्यामुळे समान कृती कार्यक्रम आखण्यासाठी ठरावीक वेळ लागणारच. मात्र आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ, असंही राऊत म्हणाले.
शस्त्रक्रियेनंतर संजय राऊत पुन्हा एकदा शिवसेनेच्या मिशन मुख्यमंत्रीसाठी मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्तावाटपावरून भाजपवर शिवसेनेकडून पहिली तोफ खासदार संजय राऊत यांनी डागली होती. भाजपकडून मुख्यमंत्रिपद देण्यास नकार आल्यानंतर अखेर शिवसेनेनं भाजपबरोबर युती तोडण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची आज मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक आयोजित करण्यात आली. डिस्चार्ज मिळाल्यानंतर संजय राऊत रुग्णालयातून थेट हॉटेल ट्रायडंटकडे चर्चेसाठी रवाना झाले आहेत.