Home महाराष्ट्र “माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही”

“माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही”

मुंबई : हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्या कोणतीही दैवी सूचना मिळत आहे की तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होतात, ती ‘धर्मनिरपेक्षता’ तुम्ही अंगिकारली?, असं  पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहलं होतं. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुनावले.

माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान,  माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे, हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

उत्तर प्रदेश पुन्हा हादरलं; झोपेत असलेल्या 3 बहिणींवर अ‍ॅसिड हल्ला

देवेंद्र फडणवीसजी ‘हा’ अहंकार होता काय?; सामना अग्रलेखातून शिवसेनेचा फडणवीसांना सवाल

‘या’ कारणासाठी विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल रूग्णालयात दाखल

“सत्ता लोकांना भ्रष्ट करत नाही, तर….”