Home क्रीडा ए.बी. डिव्हीलियर्स व विराट कोहलीची शानदार फलंदाजी; राॅयल चैलेंजर्सचे कोलकाताला 195 धावांचे...

ए.बी. डिव्हीलियर्स व विराट कोहलीची शानदार फलंदाजी; राॅयल चैलेंजर्सचे कोलकाताला 195 धावांचे लक्ष्य

दुबई : आजचा आयपीएलच्या राॅयल चैलेंजर्स बेंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी  195 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.

आजच्या या सामन्यात राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 विकेट गमावत 194 धावा केल्या. राॅयल चैलेंजर्स बेंगलोरकडून फिंच 37 चेंडूत 47 धावा, देवदत्त पडीक्कल 23 चेंडूत 32 धावा, विराट कोहली 28 चेंडूत 33 धावा, तर ए.बी. डिव्हीलियर्सने 33 चेंडूत 73 धावा केल्या.

दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सकडून आंद्रे रसेल, प्रसिद्ध कृष्णाने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्याचे, जे कधी नाही ते सगळ होत आहे- नितेश राणे

राज्य सरकार नियोजन शुन्य, व्यवहार शुन्य आणि कल्पना शुन्य; आशिष शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा

मुंबईची बत्तीगुल; कंगना रणाैतचा राज्य सरकारला टोला