Home महाराष्ट्र हिंमत असेल तर स्वबळावर लढून दाखवा; चंद्रकांत पाटलांचं राष्ट्रवादीला खुलं आव्हान

हिंमत असेल तर स्वबळावर लढून दाखवा; चंद्रकांत पाटलांचं राष्ट्रवादीला खुलं आव्हान

मुंबई : 2024 सालची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढवून दाखवावी. मग कुणाला जास्त जागा मिळतात ते पाहू, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर आव्हान दिलंय.

मिटकरी यांनी 2022 साली मनपा निवडणुकीत पुण्याची जनता अजितदादा पवार हे तुमचे बाप आहेत, हे सिद्ध करून दाखवेल. काळजी करू नका, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केली होती, या टीकेला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीला खुलं आव्हान दिलं आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार येऊनही विश्वासघात झाल्यामुळे आम्ही सत्तेत येऊ शकलो नाही. त्यावेळी सत्तास्थापनेसाठी घडलेला प्रकार भारतीय संस्कृतीला साजेसा नाही. दगा देऊन काहीही होऊ शकते. मात्र, तुमच्यात हिंमत असेल तर मैदानात उतरुन योग्यप्रकारे लढा, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 2022 कशाला 2024 च्या विधानसभेलाही माझे ओपन चॅलेंज आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी वेगवेगळे लढावे. आम्हीदेखील स्वबळावर लढू. मग कोणाला किती जागा मिळतात, ते पाहू, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

आरेतील कारशेड प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; म्हणाले…

घराबाहेर पडा आणि लोक कसं जगतात ते पहा; नवनीत राणांची मख्यमंत्र्यांना विनंती

मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धीच मिळत नाही- चंद्रकांत पाटील

“राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचा चेन्नई सुपर किंग्सवर धमाकेदार विजय”