Home महाराष्ट्र “मंदिर बंद उघडे बार, उद्धवा अजब तुझे सरकार”

“मंदिर बंद उघडे बार, उद्धवा अजब तुझे सरकार”

मुंबई : राज्य सरकारविरोधात भाजपकडून सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना आणि मंदिरं उघडण्यास परवनगी न देण्याच्या मुद्द्यावरून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.

महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात 12 ऑक्टोबर रोजी भाजप महिला आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे. तर 13 ऑक्टोबर रोजी मंदिरे उघडण्यास परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

13 ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन केले जाईल. मंदिर बंद उघडे बार ,उद्धवा अजब तुझे सरकार, असं म्हणत हीच भाजपच्या आंदोलनाची टॅगलाईन असल्याचं केशव उपाध्येंनी सांगितलं.

दरम्यान, महाआघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिला, तरुणी, बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र मुख्यमंत्री, गृहमंत्री या अत्याचारांची गंभीरपणे दखल घेत नाहीत. म्हणूनच या असंवेदनशील सरकारच्या विरोधात 12 ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे”, असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी-

शेवटच्या षटकात बाजी पलटली! कोलकाता नाईट रायडर्सचा पंजाबवर रोमहर्षक विजय

शुभमन गिल व दिनेश कार्तिक यांची शानदार अर्धशतके; कोलकाताचे पंजाबसमोर 165 धावांचे लक्ष्य

कोलकाता नाईट रायडर्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडे लक्ष देण्यापेक्षा…; रोहित पवारांचं पडळकरांना प्रत्युत्तर