Home क्रीडा शेवटच्या षटकात बाजी पलटली! कोलकाता नाईट रायडर्सचा पंजाबवर रोमहर्षक विजय

शेवटच्या षटकात बाजी पलटली! कोलकाता नाईट रायडर्सचा पंजाबवर रोमहर्षक विजय

दुबई : कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध किंग्स इलेव्हन पंजाब या सामन्यात कोलकता नाईट रायडर्सचा 2 धावांनी विजय. शेवटच्या षटकात कोलकताना नाईट रायडर्सचा विजय.

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावत 164 धावा केल्या. कोलकाताकडून शुभमन गिलने 47 चेंडूत 57 धावा केल्या. तर कर्णधार दिनेश कार्तिकने 29 चेंडूत 58 धावा केल्या. पंजाबकडून मोहम्मद शमी, अर्शदिप सिंग व रवि बिश्नोईने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

कोलकाताने केलेल्या धावांचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर कर्णधार के.एल.राहूल व मयंक अगरवालने धमाकेदार सलामी दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी केवळ 14.2 षटकात 114 धावांची सलामी दिली. याचदरम्यान, दोघांनी आपले अर्धशतकही पूर्ण केले. तसेच हे दोघेच पंजाबला विजय मिळवून देतील असे वाटत असतानाच प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर मयंक अगरवाल शुभमन गिलकडे झेल देऊन आऊट झाला. मयंकने 39 चेंडूत 56 धावा केल्या. ज्यात त्याने 6 चाैकार व 1 षटकार मारला. नंतर आलेल्या निकोलस पूरन व के.एल.राहूलने 29 धावांचा भागीदारी केली. पण 18 व्या षटकात निकोलस पूरन सुनिल नारायणच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. निकोलस पूरनने 10 चेंडूत 16 धावा केल्या. कोलकाताकडून प्रसिद्ध कृष्णाने 3  तर सुनिल नारायणने 2 विकेट घेतल्या.

 

महत्वाच्या घडामोडी-

शुभमन गिल व दिनेश कार्तिक यांची शानदार अर्धशतके; कोलकाताचे पंजाबसमोर 165 धावांचे लक्ष्य

कोलकाता नाईट रायडर्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडे लक्ष देण्यापेक्षा…; रोहित पवारांचं पडळकरांना प्रत्युत्तर

चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्त्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले…