Home महाराष्ट्र मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडे लक्ष देण्यापेक्षा…; रोहित पवारांचं पडळकरांना प्रत्युत्तर

मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडे लक्ष देण्यापेक्षा…; रोहित पवारांचं पडळकरांना प्रत्युत्तर

मुंबई : मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात असं मी विचारणार नाही, पण आतातरी आहात त्याच ठिकाणी राहिलात तरी आपल्यावरील लोकांचा विश्वास नक्की वाढेल. त्यासाठी आपण जरूर प्रयत्न करा, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

माझे मित्र गोपीचंद पडळकर जी माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडीओ पाहिला आणि मनातून आनंद झाला. बरं झालं आपण स्वतःहून या विषयाला हात घातलात. यामुळं तरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना हे खरं वाटेल. माझ्या मतदारसंघातील या एकाच नाही तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था होती आणि अजूनही काही रस्त्यांची अशीच दुरवस्था आहे. कारण या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे आपल्याच पक्षाचे आमदार होते. त्यामुळं इथं पंचवीस वर्षांचा बॅकलॉग आहे., असं रोहित पवारांना म्हटलं आहे.

मला आमदार होऊन अजून एक वर्षही झालं नाही. तरी मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरुन काढण्यासाठी काम करतोय आणि कोरोना नसता तर मतदारसंघातील बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते. असो पंचवीस वर्षांपैकी पाच वर्षे याच मतदारसंघातील आमदार हे राज्यात वजनदार खात्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते, तरीही रस्त्यांची ही दुरवस्था आहे, याचा जाब खरंतर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता. पण आपण मोठे नेते आहात त्यामुळं त्यांना जाब विचारणार नाहीत., असंही रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, रोहित पवारांना त्यांची उंची फार वाढल्यासारखी वाटते. पण त्यांना माहिती नाही, ते शरद पवारांच्या खांद्यावर बसून त्यांची उंची मोजतात. रोहित दादा, तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल, असं म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना म्हटलं होतं.

https://www.facebook.com/RRPspeaks/posts/1035327653597643

महत्वाच्या घडामोडी-

चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्त्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

आजोबांच्या खांद्यावरुन खाली उतरा, म्हणजे…; गोपीचंद पडळकरांची रोहित पवारांवर टीका

“सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न”

“महेंद्रसिंग धोनीची मुलगी जीवाला बलात्काराच्या धमक्या”