मुंबई : शिवसेनेने कोकणाला भरभरून दिले, पण या सरकारनं कोकणाला काय दिलं? विदर्भाला केवळ 16 कोटी रूपये दिले. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले असून सरकार दिसतंय तरी कुठे? असा सवाल करत माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकारव निशाणा साधला होता. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला.
राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला असं म्हणताना देवेंद्र फडणवीस आपण चुकून PM ऐवजी CM म्हणालात. कारण ही म्हण केंद्र सरकारला तंतोतंत लागू होतेय. पण आता येत्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर तरी हाती भोपळा न देता राज्याला हक्काचा निधी द्यावा, ही अपेक्षा,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
‘राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला’ असं म्हणताना @Dev_Fadnavis साहेब आपण चुकून PM ऐवजी CM म्हणालात…
कारण ही म्हण केंद्र सरकारला तंतोतंत लागू होतेय…
पण आता येत्या #GST कौन्सिलच्या बैठकीनंतर तरी हाती भोपळा न देता राज्याला हक्काचा निधी द्यावा, ही अपेक्षा.— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 9, 2020
महत्वाच्या घडामोडी-
उदयनराजेंबाबतचं आंबेडकरांचं वक्तव्य पटलं नाही- छत्रपती संभाजीराजे
“केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन”
“सनरायर्झर्स हैदराबादचा किंग्स इलेव्हन पंजाबवर धमाकेदार विजय”
रिपब्लिक चॅनेलच्या अर्णब गोस्वामींना अटक करा; शिवसेनेची मागणी