मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना ‘बिनडोक राजा’ म्हणत त्यांच्यवर सडकून टीका केली होती. त्यावर आता छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टिव्ही 9 मराठीला दिलेल्य मुलाखतीत ते बोलत होते.
उदयनराजेंबाबतचं आंबेडकरांचं वक्तव्य पटलं नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत. शाहू महाराज आणि बाबासाहेब यांचे चांगले संबंध होते. आमच्या बंधुंवर वक्तव्य करणे मला पसंत पडले नाही, त्यांनी तसं वक्तव्य करु नये, माझ्याबद्दल ते काही बोलले असतील तर ती लोकशाही आहे, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, दोन्ही राजांचा 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा आहे असं मला वाटत नाही. यातील एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या घडामोडी-
“केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन”
“सनरायर्झर्स हैदराबादचा किंग्स इलेव्हन पंजाबवर धमाकेदार विजय”
रिपब्लिक चॅनेलच्या अर्णब गोस्वामींना अटक करा; शिवसेनेची मागणी
डेव्हिड वाॅर्नर व बेअरस्टाेची शानदार 160 धावांची सलामी; हैदराबादचे पंजाबसमोर 202 धावांचे लक्ष्य