मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं आज निधन झालं आहे. हृदविकाराचा झटका आल्याने त्यांनी राहत्या घरी आज अखेरचा श्वास घेतला. ते 68 वर्षांचे होते.
अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं होतं. त्यांच्या अनेक नाटकांना प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. एक चार्मिंग अभिनेता अशी त्यांची इमेज होती.
1978 मध्ये त्यांनी चित्रपसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यांनी केलेले अनेक सिनेमे गाजले. यात जशास तसे, माझा नवरा तुझी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, चालू नवरा भोळी बायको, माफीचा साक्षीदार आदी अनेक चित्रपटांत काम केलं.
दरम्यान, रंगभूमीशीही त्यांनी आपली नाळ जोडलेलीच ठेवली. यात सौजन्याची एैशीतैशी, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुज आहे तुजपाशी या नाटकांचा त्यात समावेश होता.
महत्वाच्या घडामोडी-
एक राजा तर बिनडोक तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर- प्रकाश आंबेडकर
अमर, अकबर, अँथनी हे तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील; दानवेंच्या टीकेवर काॅंग्रेसचं प्रत्युत्तर
कोलकाता नाईट रायडर्सची चेन्नई सुपर किंग्सवर मात