Home क्रीडा कोलकाता नाईट रायडर्सची चेन्नई सुपर किंग्सवर मात

कोलकाता नाईट रायडर्सची चेन्नई सुपर किंग्सवर मात

दुबई : आजचा आयपीएलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात कोलकाताने चेन्नईचा 10 धावांनी पराभव केला.

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्व गडी गमावत 167 धावा केल्या. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने 51 चेंडूत 81 धावा केल्या. तर पॅट कमिंस व सुनिल नारायणने प्रत्येकी 9 चेंडूत 17 धावा केल्या. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्होने व सॅम करनने 3 विकेट तर शार्दुल ठाकूर व कर्ण शर्मा यांनी 2 विकेट घेतल्या.

धावांचा पाठलाग करताना चेन्नईने सलामीला आलेल्या शेन वाॅट्सन व फाफ ड्यू प्लेसिसने धमाकेदार सलामी दिली. दोघांनी 3.4 षटकात 30 धावांची सलामी दिली. जम बसलेला फाफ फटकेबाजी करण्याच्या नादात आऊट झाला. फाफने 10 चेंडूत 17 धावा केल्या. नंतर आलेला अंबाती रायडूने शेन वाॅटसनच्या साथीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 69 धावांची भागीदारी केली. ही जोडी चेन्नईला विजय मिळवून देणार असे वाटत असतानाच कमलेश नागरकोट्टीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रायडू आऊट झाला. रायडूने 27 चेंडूत 30 धावा केल्या. नंतर सेट झालेला वाॅट्सनही सुनिल नारायणच्या गोलंदाजीवर आऊट झाला. वाॅट्सनने 40 चेंडूत 50 धावा केल्या. वाॅट्सननंतर आलेला सॅम करन व कर्णधार महेंद्रसिंग धोनीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात धोनी आऊट झाला. धोनीने 12 चेंडूत 11 धावा केल्या. धोनीनंतर सेट होत असलेला सॅम करनही रसेलच्या गोलंदाजीवर माॅर्गनकडे झेल देऊन आऊट झाला. करनने 11 चेंडूत 17 धावा केल्या. आता चेन्नईला 17 चेंडूत 39 धावांची गरज. 18 व्या षटकात रसेलच्या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा निघाल्या. आता चेन्नईला 12 चेंडूत 36 धावांची गरज. 19 व्या षटकात नारायणच्या ओव्हरमध्ये केवळ 10 धावा निघाल्या. आता चेन्नईला 6 चेंडूत 26 धावांची गरज. पहिला चेंडू डाॅट, दुसरा चेंडू डाॅट, तिसरा चेंडूवर 1 धाव. आता 3 चेंडूत 25 धावांची गरजय चाैथ्या चेंडूवर सिक्स आता 2 चेंडूत 19 धावांची गरज. पाचव्या चेंडूवर चाैकार. आता 1 चेंडूत 15 धावांची गरज. सहाव्या चेंडूवर चाैकार. व कोलकाताचा चेन्नईवर 10 धावांनी विजय झाला. जडेजाने 8 चेंडूत 21 धावा करत चेन्नईच्या हारचे अंतर कमी केलं.

कोलकाताकडून वरूण चक्रवर्ती, कमलेश नागरकोट्टी, शिवम मावी, आंद्रे रसेल, सुनिल नारायणने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

अमृता फडणवीसांचा नवा हटके लूक; ट्विट करत म्हणाल्या…

राहुल त्रिपाठीचे शानदार अर्धशतक; कोलकाताचे चेन्नईसमोर 168 धावांचे लक्ष्य

टेनिसचा आनंद लुटताना राज ठाकरे; राज ठाकरेंचा नवा फिटनेस फंडा

“अखेर रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर”