Home महाराष्ट्र हाथरस प्रकरणी नरेंद्र मोदी गप्प का?; योगी सरकारने काहीही दडवू नये- संजय...

हाथरस प्रकरणी नरेंद्र मोदी गप्प का?; योगी सरकारने काहीही दडवू नये- संजय राऊत

मुंबई : उत्तरप्रदेशातील हाथरस झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

हाथरस प्रकरणावरून नरेंद्र मोदी गप्प का आहेत? असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी केला. तसेच योगी सरकारने काहीही दडवू नये, असंही संजय राऊत म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये योगी हे एक भगवे कपडे घालतात, ते संन्यासी आहेत, असं आम्ही मानतो, त्यांचा आदर करतो. रामाचं मंदिर अयोध्येत उभं राहतं. सितामाई जिच्यावर उभी आहे. त्या सितामाईची पूजा सुद्धा त्या मागच्या महिन्यात झाली प्रधानमंत्री आणि योगींच्या हस्ते. आज ती सितामाईसुद्धा हाथरससारख्या मुलीचं किंकाळ्या ऐकून पुन्हा एकदा मला भूमी दुबंगून पोटात घ्या, अशा प्रकरचा आक्रोश त्या करत असतील, असं मला वाटतं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्र यावं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा

जसप्रित बुमराची भेदक गोलंदाजी; मुंबई इंडियन्सचा राजस्थान राॅयल्सवर धमाकेदार विजय

“चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार”