अहमदनगर : महाविकास आघाडी सरकार पडेल, असे दावे भाजप नेत्यांकडून सातत्याने सुरु आहेत. त्यातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी शरद पावर यांना शिवसेना संपवायची आहे, असं वक्तव्य करत शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
शरद पवार सांगतायत की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कॅप्टन आहेत, मात्र त्यांना बाहेर फिरु दिले जात नाही. त्याचवेळी ते स्वतः मात्र या वयात सर्वत्र फिरत आहेत. शिवसेना संपवणे हा त्यामागचा एकमेव हेतू असल्याचे स्पष्ट दिसून येते. हे करत असताना राष्ट्रवादीला कशाप्रकारे ताकद मिळेल याचा प्रयत्नदेखील त्यांच्याकडून सुरु आहे, असं शिवाजी कर्डीले म्हणाले.
हे सरकार अपयशी ठरल्याचे मी बोलत नाही तर सर्वसामान्य जनता तसं म्हणते. हे सरकार कोरोनाला रोखण्यात साफ अपयशी ठरलं आहे. अनेक ठिकाणी रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाहीत, ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. औषधेदेखील मिळत नाहीत. परंतु त्याच वेळी हॉस्पिटलची लाखो रुपयांची बिलं मात्र द्यावी लागतात. यावरुन स्पष्ट होतंय की, हे सरकार अपयशी ठरलं आहे, असंही शिवाजी कर्डीले यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
जसप्रित बुमराची भेदक गोलंदाजी; मुंबई इंडियन्सचा राजस्थान राॅयल्सवर धमाकेदार विजय
“चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार”
सुर्यकुमार यादवचे नाबाद दमदार अर्धशतक; मुंबईचे राजस्थानसमोर 194 धावांचे लक्ष्य
माझं कुटुंब, माझी जबाबदारी; तुम्ही सगळे मरा, मी राहतो घरीच; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका