Home क्रीडा जसप्रित बुमराची भेदक गोलंदाजी; मुंबई इंडियन्सचा राजस्थान राॅयल्सवर धमाकेदार विजय

जसप्रित बुमराची भेदक गोलंदाजी; मुंबई इंडियन्सचा राजस्थान राॅयल्सवर धमाकेदार विजय

दुबई : आजच्या आयपीएलच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान राॅयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान राॅयल्सचा 57 धावांनी पराभव केला.

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावत 193 धावा केल्या आहेत. मुंबईकडून सुर्यकुमार यादवने सर्वाधिक 47 चेंडूत नाबाद 79 धावा केल्या. तर डिकाॅकने 15 चेंडूत 23 धावा, रोहित शर्माने 23 चेंडूत 35 धावा, तर हार्दिक पांड्याने 19 चेंडूत 30 धावा केल्या.तर राजस्थान राॅयल्सकडून श्रेयस गोपालने 2, तर जोफ्रा आर्चर व कार्तिक त्यागीने 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना राजस्थान राॅयल्सची सुरूवात खराब झाली. सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वाल डावाच्या पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर शून्यावर आऊट झाला. त्यांनतर आलेला कर्णधार स्टिव्ह स्मिथही केवळ 6 धावांवर आऊट झाला. स्मिथ आऊट झाल्यावर संजू सॅमसनही शून्यावर बाद झाला. त्यामुळे राजस्थानची 2.5 षटकात 3 बाद 12 अशी अवस्था झाली. त्यानंतर आलेला महिपाल लोमरोर व जाॅस बटलरने डाव सावरण्याचा प्रयत्न करत 30 धावांची भागीदारी केली. पण मोठा फटका खेळण्याच्या नादात महिपाल लोमरोर आऊट झाला. महिपालने 13 चेंडूत 11 धावा केल्या. नंतर आलेल्या टाॅम करन व जाॅस बटलरने डाव सावरला. याचदरम्यान, जाॅस बटलरने आपले अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी 58 धावांची भागीदारी केली. पण नंतर धावगती वाढवण्याच्या नादात जाॅस बटलर आऊट झाला. जाॅस बटलरने 44 चेंडूत 70 धावा केल्या. बटलरनंतर टाॅम करनही लगेच आऊट झाला. करनने 16 चेंडूत 15 धावा केल्या. तर राजस्थानचा हुकूमी एक्का राहूल तेवतियाही काही करू शकला नाही. व तोही केवळ 5 धावांवर आऊट झाला. तर जोफ्रा आर्चरने 11 चेंडूत 24 धावा करून राजस्थानचा हारचं अंतर कमी केल. राजस्थानने 20 षटकात सर्व बाद 136 धावा केल्या.

मुंबईकडून जसप्रित बुमराने 4, ट्रेंट बोल्टने 2, जेम्स पॅटिन्सनने 2, तर राहूल चहर व कायरन पोलार्डने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

“चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार”

सुर्यकुमार यादवचे नाबाद दमदार अर्धशतक; मुंबईचे राजस्थानसमोर 194 धावांचे लक्ष्य

माझं कुटुंब, माझी जबाबदारी; तुम्ही सगळे मरा, मी राहतो घरीच; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

“तिन्ही पक्षांच्या सरकारने पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला”