Home क्रीडा “दिल्ली कॅपिटल्सचा राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरवर दणदणीत विजय”

“दिल्ली कॅपिटल्सचा राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरवर दणदणीत विजय”

दुबई : आजच्या आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरचा 59 धावांनी पराभव केला.

राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकून दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावत 196 धावा केल्या. दिल्लीकडून पृथ्वी शाॅने 23 चेंडूत 42, शिखर धवनने 28 चेंडूत 32 धावा, तर मार्कस स्टाॅयनिसने 26 चेंडूत 53 धावा केल्या. तर राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून मोहम्मद सिराजने 2 तर ईशुरू उडाना व मोईन अली यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरची सुरूवात खराब झाली. सलामीला आलेल्या देवदत्त पडीक्कल व फिंचने 3 षटकात 20 धावांची सलामी दिली. पण तिसऱ्या षटकात पडीक्कल आऊट झाला. पडीक्कलने केवळ 4 धावा केल्या. तर पुढच्याच षटकात फिंचही आऊट झाला. फिंचने 14 चेंडूत 13 धावा केल्या. फिंचनंतर आलेला मिस्टर 360 एबी डिव्हीलियर्सही आज काही खास करू शकला नाही. डिव्हीलियर्सही केवळ 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली व मोईन अलीने डाव सावरण्याचा प्रयत्न करत 32 धावांची भागीदारी केली. पण मोठा फटका खेळण्याच्या नादात मोईन अली आऊट झाला. मोईन अलीने 13 चेंडूत 11 धावा केल्या. नंतर सेट झालेला कोहली धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात आऊट झाला. कोहलीने 39 चेंडूत 43 धावा केल्या. ज्यात त्याने 2 चाैकार 1 षटकार मारला. नंतर आलेल्या वाॅशिंग्टन सुंदरने काही फटके खेळले. पण नंतर तोही आऊट झाला. सुंदरने 11 चेंडूत 17 धावा केल्या. नंतर तळातील फलंदाज देखील काही करू शकले नाहीत. आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने 20 षटकात 9 गडी बाद 137 धावा केल्या.

दिल्लीकडून कगिसो रबाडाने 4, अक्षर पटेलने 2, नाॅर्त्झेने 2 तर आर अश्विनने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठवणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये- रामदास आठवले

मार्कस स्टाॅयनिसचे शानदार अर्धशतक; दिल्लीचे राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरला 197 धावांचे लक्ष्य

“….यामुळे भाजपा नेत्यांच्या संस्कारावरच प्रश्नचिन्ह”

दानवे किती रस्त्यावर असतात हे माहीत आहे; बाळासाहेब थोरातांचा दानवेंना टोला