मुंबई : राहुल गांधी यांना रस्त्यावरील आंदोलनाची सवय नाही, असं वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलं होतं, त्याला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
रावसाहेब दानवे किती रस्त्यावर असतात हे आम्हा सर्वांना माहिती आहे. मुळात ते लाटेवर निवडून आले आहेत. परिणामी त्यांच्याविषयी फार बोलण्याची गरज नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
दरम्यान, मुलींवर होणारा अन्याय देश सहन करु शकत नाही. सर्वांच्याच भावना तीव्र आहेत.
समाज उत्स्फुर्तपणे रस्त्यावर येत असताना भाजपची भूमिका संशयास्पद आहे. भाजपचे आमदार केवळ संस्कृतीच्या गप्पा मारतात. हाथरसमध्ये ज्या मुलीवर अत्याचार झाले, ती संस्कारित नव्हती का? ज्या मुलांनी तिच्यावर अत्याचार केले, ते संस्कारित होते का, असा सवालही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी-
नटीसाठी छाती बडवणाऱ्यांना हाथरसचं तिकीट काढून द्या- संजय राऊत
“माझ्याजवळ गिरीश महाजन यांची अनेक गुपिते आहेत, त्यामुळे मला ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत”
“शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची कोरोनावर मात”
“आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाडं फोडली नाही”