मुंबई : काँग्रेस नेते प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमधील हाथरस घटनेतील पीडितेच्या कुटुंबियांची घरी जात असताना त्यावेळी यमुना एक्सप्रेसवेवर पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. तेव्हा गर्दीतील एक फोटो व्हायरल होत आहे. यावरुन महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.
महिला नेत्यांच्या कपड्यांवर हात टाकण्याची पोलिसांची हिंमत कशी होते, असा संतप्त सवाल करत चित्रा वाघ यांनी संबंधित पोलिसांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, महिला नेत्यांच्या कपड्यावर हात टाकण्याची पुरुष पोलिसांची हिंमत कशी होते? जर महिला समोर येऊन एखाद्या गोष्टीला पाठिंबा देत असतील तर कुठलेही पोलीस असेना त्यांनी आपल्या मर्यादांचं भान ठेवलं पाहिजे. भारतीय संस्कृतीत विश्वास ठेवणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
पुरुष पुलिस की जुर्रत कैसे हुई कि वो एक महिला नेता के वस्त्रों पर हाथ डाल सके!समर्थन मे अगर महीलाए आगे आ रही है पुलीस कही की भी हो उन्हे अपनी मर्यादा का ध्यान रखना ही चाहीए
भारतीय संस्कृती मे विश्वास रखनेवाले मुख्यमंत्री @myogiadityanath जी ऐसे पुलीसवालोपर सख्त कारवाई करे @dgpup pic.twitter.com/RfbXiIIXcI— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 4, 2020
महत्वाच्या घडामोडी-
मुंबई इंडियन्सचा सनराईझर्स हैदराबादवर दणदणीत विजय
“मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अजिंक्य रहाणेची भावनिक पोस्ट”
“हाथरसमधील पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी काँग्रेस उद्या राज्यभर सत्याग्रह करणार”
आंध्रप्रमाणे महाराष्ट्रात दिशा कायदा लागू करावा; काँग्रेस नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र