दुबई : आजच्या आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरूद्ध सनराईझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनराईझर्स हैदराबादला 34 धावांनी पराभव केला.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 208 धावा केल्या. मुंबईकडून क्विंटन डीकाॅकने सर्वाधिक 39 चेंडूत 67 धावा केल्या. सुर्यकुमार यादवने 18 चेंडूत 27, तर हार्दिक पांड्याने 19 चेडूज 28 धावा, इशान किशनने 23 चेंडूत 31, पोलार्डने 13 चेंडूत 25 धावा, तर कृणाल पांड्याने 4 चेंडूत 20 धावा केल्या. सनराईझर्स हैदराबादकडून सिद्धार्थ काैलने 2, संदिप शर्माने 2, तर तर रशिद खानने 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना सनराईझर्स हैदराबादने धमाकेदार सुरूवात केली. जाॅनी बेअरस्टो व डेव्हिड वाॅर्नरने 4 षटकात 34 धावांची सलामी दिली. मोठा फटका खेळण्याच्या नादात बेअरस्टो आऊट झाला. बेअरस्टोने 15 चेंडूत 25 धावा केल्या. नंतर आलेल्या मनिष पांडे व डेव्हिड वाॅर्नरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 60 धावांची भागीदारी केली. पण मनिष पांडे फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात आऊट झाला. मनिष पांडेने 19 चेंडूत 30 धावा केल्या. नंतर आलेला केन विल्यिम्सही केवळ 3 धावांवर आऊट झाला. तर मागच्या मॅचचा हिरो प्रियम गर्गही केवळ 8 धावांवर आऊट झाला. याचदरम्यान, वाॅर्नरने आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर वाॅर्नरने आक्रमक फटके खेळले. मात्र वाॅर्नरही मोठा फटका खेळण्याच्या नादात आऊट झाला. वाॅर्नरने 44 चेंडूत 60 धावांची खेळी केली. वाॅर्नर आऊट झाल्यावर आलेल्या अब्दूल समदने काही फटके खेळले. आता हैदराबादला विजयासाठी 18 चेंडूत 51 धावांची गरज. 18 व्या षटकात केवळ 4 धावाच निघाल्या. आता 12 चेंडूत 47 धावांची गरज. 19 व्या षटकात 10 धावा निघाल्या. आणि हैदराबादने याच षटकात 2 विकेट गमावल्या. आता हैदराबादला 6 चेंडूत 37 धावांची गरज. शेवटच्या षटकात केवळ 2 धावाच निघाल्या.
मुंबईकडून बोल्ट, पॅटिन्सन व बुमराने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर कृणाल पांड्याने 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
“मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अजिंक्य रहाणेची भावनिक पोस्ट”
“हाथरसमधील पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी काँग्रेस उद्या राज्यभर सत्याग्रह करणार”
आंध्रप्रमाणे महाराष्ट्रात दिशा कायदा लागू करावा; काँग्रेस नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र