Home महाराष्ट्र आंध्रप्रमाणे महाराष्ट्रात दिशा कायदा लागू करावा; काँग्रेस नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र

आंध्रप्रमाणे महाराष्ट्रात दिशा कायदा लागू करावा; काँग्रेस नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर : आंध्रप्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रात दिशा कायदा पारित करावा, अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली आहे.

उत्तरप्रदेशात घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण देश पेटला आहे. नागपूरसह संपूर्ण राज्यात या घटना घडतात. त्यावर निर्बंध घालण्यासाठी हे पाऊल उचलावे, अशी विनंती आशिष देशमुखांनी केली आहे.

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरदेखील महिला आणि अल्पवयीन मुलींसाठी सुरक्षित नाही. गेल्या 3 वर्षात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात सतत वाढ होत आहे. 2018 च्या तुलनेत 2019 मधील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा आकडा 21 टक्क्यांनी वाढला आहे, असं  आशिष देशमुखांनी पत्रात म्हटलं आहे.

पोक्सो अंतर्गत असलेल्या गुन्ह्यांमध्ये नागपूर देशात दहाव्या क्रमांकावर आहे. तर महिलांवरील अन्यायाच्या गुन्ह्यात नागपूरचा देशात 12 वा क्रमांक लागतो. पोक्सोमध्ये 10 वा, अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात 10 वा, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रयत्नात 6वा, महिलांवरील अत्याचारात 12वा आणि अपहरणात 7 वा क्रमांक आहे. त्यामुळे नागपुरातील एकंदर परिस्थिती गंभीर होत चालली आहे, असंही आशिष देशमुख म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

क्विंटन डिकाॅक, हार्दिक पांड्या, कायरान पोलार्डची तुफानी फलंदाजी; मुंबईचे हैदराबादसमोर 209 धावांचे लक्ष्य

‘हे’ तर मुंबईला बदनाम करण्याचं कारस्थान रचलं गेलं- किशोरी पेडणेकर

महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का?- जितेंद्र आव्हाड

अखेर मुहूर्त ठरला ! महाराष्ट्रातील शाळा ‘या’ दिवसापासून सुरू होणार- बच्चू कडू