Home क्रीडा “दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर 18 धावांनी विजय”

“दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर 18 धावांनी विजय”

दुबई : आजच्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 18 धावांनी पराभव केला.

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 228 धावा केल्या. दिल्लीकडून पृथ्वी शाॅने 41 चेंडूत 66 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने 38 चेंडूत 88 धावा केल्या. शिखर धवनने 16 चेंडूत 26 धावा, तर रिषभ पंतने 17 चेंडूत 38 धावा केल्या. तर कोलकाताकडून आंद्रे रसेलने 2 विकेट घेतल्या. तर कमलेश नागरकोट्टी व वरूण चक्रवर्तीने 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरूवात खराब झाली. सुनिल नारायण दुसऱ्याच षटकात केवळ 3 धावांवर आऊट झाला. नंतर शुभमन गिल व नितीश राणा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 64 धावांची भागीदारी केली. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शुभमन गिल आऊट झाला. शुभमनने 22 चेंडूत 28 धावा केल्या. त्याला अमित मिश्राने विकेटकीपर रिषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. नंतर आलेल्या आंद्रे रसेलने काही फटके खेळले. पण धावगती वाढवण्याच्या नादात रसेल रबाडाच्या गोलंदाजीवर आऊट झाला. रसेलने 8 चेंडूत 13 धावा केल्या. याचदरम्यान, नितीश राणाने आपले अर्धशतक पूर्ण केले. राणाने आपले अर्धशतक 32 चेंडूत पूर्ण केले. मात्र अर्धशतक पूर्ण झाल्यावर राणा फटकेबाजी करण्याच्या नादात आऊट झाला. त्याला हर्शल पटेलने सब्स्टिट्यूट फिल्डर अक्षर पटेलकडे झेल देण्यास भाग पाडले. राणाने 35 चेंडूत 58 धावा केल्या. राणा आऊट झाल्यावर पुढच्याच चेंडूवर कर्णधार दिनेश कार्तिकही आऊट झाला. नंतर आलेला पॅट कमिंसही केवळ 5 धावांवर आऊट झाला. नंतर इयाॅन माॅर्गन व राहूल त्रिपाठी यांनी डाव सावरत संघाला विजयाजवळ नेण्याचा प्रयत्न केला. रबाडाच्या 18 व्या षटकात माॅर्गनने सलग 3 षटकार मारत 23 धावा वसूल केल्या. आता कोलकाताला 12 चेंडूत 31 धावांची गरज. 19 व्या षटकात माॅर्गन आऊट झाला. माॅर्गनने 18 चेंडूत 44 धावांची खेळी केली. या षटकात केवळ 5 धावाच निघाल्या. आता कोलकाताला 6 चेंडूत 26 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर चाैकार. आता 5 चेंडूत 22 धावांची गरज. पुढच्या चेंडूवर त्रिपाठी आऊट. 4 चेंडूत 22 धावा. पुढच्या चेंडूवर 1 धाव, 3 चेंडूत 21 धावा, पुढच्या चेंडूवर 1 धाव, 2 चेंडूत 20 धावा, पुढच्या चेंडूवर एकही धाव नाही. 2 चेंडूत 20 धावा. पुढच्या चेंडूवर 1 धाव. आणि कोलकाताने 20 षटकात 8 बाद 210 धावा केल्या. अशा प्रकारे दिल्ली कॅपिटल्सचा 18 धावांनी विजय झाला.

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सकडून नाॅर्त्झने 3, हर्शल पटेलने 2, स्टाॅयनिसन 1, कगिसो रबाडाने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

पृथ्वी शाॅ व श्रेयस अय्यरची शानदार अर्धशतके; दिल्लीचे कोलकातासमोर 229 धावांचे लक्ष्य

हाथरस आणि बलरामपूर घटनेवरुन अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका; म्हणाले…

विराट कोहली व देवदत्त पडीक्कलची शानदार भागीदारी; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय

राजस्थान रॉयल्सचे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 155 धावांचे लक्ष्य