दुबई : राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयासाठी 155 धावांचे आव्हान दिले आहे.
राजस्थानने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 154 धावा केल्या. राजस्थानकडून महिपाल लोमरुरने सर्वाधिक 47 धावा केल्या. तर अखेरच्या काही षटकात राहुल तेवतिया आणि जोफ्रा आर्चरने फटकेबाजी केली. राहुल तेवतियाने 12 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या. तर जोफ्रा आर्चरने नाबाद 16 धावा केल्या. तर बंगळुरुकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर इशुरू उडाणाने 2, तर नवदीप सैनीने 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
राजस्थान राॅयल्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
उत्तर प्रदेश पुन्हा बलात्कारानं हादरलं; मेरठमध्ये 8 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार
हाथरस, बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे? शिवसेनेचं भाजपवर टीकास्त्र
हाथरस घटनेवर भाजपचे लोक रस्त्यावर का उतरत नाहीत?- इम्तियाज जलील