Home क्रीडा “सनरायजर्स हैदराबादचा चेन्नई सुपर किंग्जवर रोमहर्षक विजय”

“सनरायजर्स हैदराबादचा चेन्नई सुपर किंग्जवर रोमहर्षक विजय”

दुबई : आजच्या सनरायजर्स हैदराबाद विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा 7 धावांनी पराभव केला.

सनरायजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 164 धावा केल्या. हैदराबादकडून प्रियम गर्गने सर्वाधिक 26 चेंडूत 51 धावा केल्या. अभिषेक शर्माने 24 चेंडूत 31 धावा, मनिष पांडेने 21 चेंडूत 29 धावा, तर कर्णधार डेव्हिड वाॅर्नरने 29 चेंडूत 28 धावा केल्या. चेन्नईकडून दीपक चहरने 2, तर शार्दूल ठाकूर व पियुष चावलाने 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात खराब झाली. शेन वाॅट्सन केवळ 1 धावांवर भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर आऊट झाला. नंतर आलेला अंबाती रायडूही फार काळ टिकला नाही. तोही केवळ 8 धावांवर आऊट झाला. केदार जाधवही केवळ 3 धावांवर आऊट झाला. पण फाफ डूयू प्लेसिस एक बाजू लावून होता. त्याने 19 चेंडूत 22 धावांची खेळी केली. पण धावगती वाढवण्याच्या नादात डूयू प्लेसिस आऊट झाला. त्यामुळे चेन्नईची धावसंख्या 8.2 षटकात 4 बाद 42 अशी झाली. नंतर कर्णधार धोनी व रविंद्र जडेजा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 72 धावांची भागीदारी करत चेन्नईची धावसंख्या 114 वर नेली. मोठा फटका खेळण्याच्या नादात जडेजा आऊट झाला. जडेजाने 35 चेंडूत 50 धावा केल्या. नंतर आलेल्या सॅम करनने काही फटके खेळले. तसेच धोनी अजूनही मैदानात होता. आणि शेवटच्या षटकात चेन्नईला 28 धावांची गरज होती. पहिला चेंडू वाईड व चाैकार गेला.आता 6 चेंडूत 23 धावा. नंतरच्या चेंडूवर 2 धावा निघाल्या. आता 5 चेंडूत 21. पुढच्या चेंडूत चाैकार आता 4 चेंडूत 17 धावा. नंतरच्या चेंडूत 1 धावा निघाल्या. आता 3 चेंडूत 16 धावा. पुढच्या चेंडूवर 1 धाव. आता 2 चेंडूत 15 धावा. नंतरच्या चेंडूवर 1 धाव. आता 1 चेंडूत 14 धावा. शेवटच्या चेंडूवर सिक्स. आणि चेन्नईला 7 धावा विजयासाठी कमी पडल्या.

हैदराबादकडून टी.नटराजनने 2, तर भुवनेश्वर कुमार व अब्दूल समादने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्रात जरा काय घडलं की राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे कुठे आहेत?- अमोल कोल्हे

भाजप म्हणजे नवी ईस्ट इंडिया कंपनीच; अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका

दोषींना ‘अशी’ शिक्षा केली जाईल की…; हाथरस प्रकरणावर योगी आदित्यनाथांनी सोडलं मौन

राहुल गांधी यांना धक्काबुक्की कोण करणार नाही, त्यांचा तोल गेला असावा- रावसाहेब दानवे