मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 19 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. दरम्यान, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्या पीडित मुलीचा मृत्यू झाला होता. यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
बेटी बचाओ, बेटी पढावो, या केंद्र सरकारच्या मोहिमेच्या अगदी उलट कारभार उत्तर प्रदेशात सुरु आहे. हाथरस येथील घटनेनंतर बलरामपूर येथे सामूहिक बलात्कार व हत्येची आणखी एक घटना उजेडात आली. हे कधी थांबणार आहे?, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत योगी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
या अमानुष घटना थांबविण्यासाठी कठोर कायदे करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून कठोर कायदे करण्याची व ते राबविण्याची गरज आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
#बेटी_बचाओ_बेटी_पढावो या केंद्र सरकारच्या मोहिमेच्या अगदी उलट कारभार उत्तर प्रदेशात सुरु आहे. #हाथरस येथील घटनेनंतर बलरामपूर येथे सामूहिक बलात्कार व हत्येची आणखी एक घटना उजेडात आली. हे कधी थांबणार आहे?
— Supriya Sule (@supriya_sule) October 1, 2020
या अमानुष घटना थांबविण्यासाठी कठोर कायदे करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून कठोर कायदे करण्याची व ते राबविण्याची गरज आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) October 1, 2020
महत्वाच्या घडामोडी-
हाथरसनंतर आता बलरामपूरमध्येही एका मुलीवर सामूहिक बलात्कार; पीडितेचा मृत्यू
पवारांना हे झेपणारही नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही- अतुल भातखळकर
“कोलकाता नाईट रायडर्सचा राजस्थान राॅयल्सवर धमाकेदार विजय”
5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट सुरू; थिएटर, शाळा राहणार बंद