लखनऊ : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 19 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. दरम्यान, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्या पीडित मुलीचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये एका दुसर्या तरुणीवर 2 जणांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बलरामपूरच्या गायसरी गावात ही घटना घडली. 22 वर्षीय पीडित विद्यार्थी बीकॉमच्या द्वितीय वर्षात शिकत होती. विद्यार्थिनीनीवर तिच्या कॉलेजमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.
पीडितेच्या कुटुंबीकडून मिळालेली माहिती अशी की, ती एका खासगी कंपनीत नोकरी करत असे. ती घरी परत येत असताना तिचे अपहरण केले. बेशुद्ध अवस्थेत ती रिक्षातून घरी परत आली. तिची अवस्था वाईट झालेली होती. तिला उभी राहण्याची ताकदही नव्हती. अत्याचार करणाऱ्यांनी तिचे घरी येत असताना अपहरण केले, असा दावा पीडितेच्या कुटूंबाने केला आहे. मुलीची प्रकृती पाहून पालक काळजीत पडले आणि त्यांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु रुग्णालयात जात असतानाच तिचे निधन झाले.
दरम्यान, याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
पवारांना हे झेपणारही नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही- अतुल भातखळकर
“कोलकाता नाईट रायडर्सचा राजस्थान राॅयल्सवर धमाकेदार विजय”
5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट सुरू; थिएटर, शाळा राहणार बंद