मुंबई : माझी लढाई ही धनंजय मुंडें यांच्यासोबत नाही तर त्यांच्यापेक्षा शरद पवारांसोबत होती. असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
शरद पवार हे धनंजय मुंडें यांचे नेत आहेत. धनंजय मुंडे यांच्या विजयामध्ये शरद पवार यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्याबरोबर लढणं हा अनुभवाचा विषय आहे. याचा अर्थ आपण अगदीच झिरो आहोत, असाही नाही, असंही त्या म्हणाल्या.
शरद पवारांनी जे काम केलं त्याचा परिणाम चांगला झाला. ते मोठे नेते नाहीत तर ते एक मोठी व्होट बँक आहेत. त्यांचं पावसातलं भाषण या सगळ्या गोष्टींचा जनमानसावर चांगला परिणाम झाला. मतांवरही त्याचा परिणाम झाला, असं पंकजा म्हणाल्या आहेत.
धनंजय मुंडे सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिले. तसेच त्यांची शक्ती वाढत गेली. त्यांची शक्ती कमी करण्यासाठी कुठेही प्रयत्न झाले नाहीत. पण धनंजय मुंडे यांनी नेहमी माझ्याविषयी नकारात्मक बोलू नये. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असंही त्या म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
-खासदार धैर्यशील माने यांनी पुरवला लेकीचा बालहट्ट; संसदेतील सर्व नेत्यांशी घडवून आणली भेट
-बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची जागा निश्चित; ‘या’ ठीकाणी उभा राहणार स्मारक
-माझ्या मते जाहीर झालेलं खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरुपाचे – जयंत पाटील
-मुख्यमंत्र्यांनी दिली परवानगी.. पालिकेमार्फत लवकरच स्वतंत्र वीजनिर्मिती सुरु होणार!