मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्राैत्सव, दुर्गापूजा आणि दसऱ्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
सार्वजनिक नवरात्राैत्सवातील मूर्ती 4 फुटांपेक्षा तर घरगुती मूर्ती 2 फुटांपेक्षा मोठी नसावी, असा नियम घालून देण्यात आला आहे. तसेच यंदा देवीची मिरवणूक देखील काढता येणार नाही. मंडपामध्ये सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक असणार आहे. तसेच दर्शनेच्या रांगांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा लागणार आहे, असे नियम लावण्यात आले आहे.
यावर्षी गरबा, दांडियावर बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन गर्दी न करता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दसऱ्याच्या दिवशी मात्र रावण दहन करता येणार आहे, मात्र या कार्यक्रमाला गर्दी होणार नाही, अशीही सूचना देण्यात आली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का? मनसेचा मुख्यमंत्र्यांना सवाल
“उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण “
आमच्यात मतभेद असलं तरी…; राऊत आणि फडणवीसांच्या भेटीवर रावसाहेब दानवेंची
“राॅयल चैलेंजर्स बेंगलोर विरूद्ध मुंबई इंडियन्स सामना टाय; सुपर ओव्हरमध्ये राॅयल चैलेंजर्सचा विजय