“राष्ट्रवादीचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण”

0
318

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे., असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं.

डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत.मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी.शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे., असंही अमोल कोल्हे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

राणे म्हणतात, आता उद्धव काळ संपला; संजय राऊत म्हणाले…

“शिवसैनिकांची कृती म्हणजे बुरसटलेली तालिबानी मानसिकता”

आम्ही निघून गेल्यानंतर गोमूत्र शिंपडलं, समोर असता तर तेच गोमूत्र…; निलेश राणेंचा हल्लाबोल

“आमदार गोपीचंद पडळकरांनी करून दाखविलं, पोलिसांना गुंगारा देत अखेर बैलगाडी शर्यत संपन्न”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here