दुबई : आजच्या सनराईझर्स हैदराबाद विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनराईझर्स हैदराबादचा विकेट्सने पराभव केला.
सनराईझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 1 विकेट गमावून 142 धावा केल्या. हैदराबादकडून मनिष पांडेने सर्वाधिक 51 धावा केल्या. तर सलामीवीर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 36 तर ऋद्धीमान साहाने 30 धावा केल्या. कोलकाताकडून पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्थी आणि आंद्रे रसेल या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या शुभमन गिल व सुनिल नारायणने 6 धावांची सलामी दिली. नारायण 0 धावांवर बाद झाला. त्याला खलील अहमदने आऊट केले. 3 नंबरवर आलेल्या नितीश राणा व शुभमन गिल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 37 धावांची भागीदारी केली. डाव सावरत नाही तोवरच राणा आऊट झाला. राणाने 13 चेंडूत 26 धावा केल्या. नंतर आलेला कर्णधार दिनेश कार्तिक फार काळ टिकला नाही. कार्तिक शून्यावर आऊट झाला.
एका बाजूने विकेट्स पडत असताना शुभमन गिल मात्र सेट झाला होता. दरम्यान गिलने आपले अर्धशतक पूर्ण केले. कार्तिक बाद झाल्यावर आलेल्या इयाॅन माॅर्गनने शुभमन गिलच्या साथीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 14 व्या षटकात संघाची धावसंख्या 102 वर नेली. सेट झाल्यानंतर दोघांनी धावगती वाढवली. याचदरम्यान दोघांनी 90 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. शुभमन गिलने 62 चेंडूत 70 धावा केल्या. तर माॅर्गनने 29 चेंडूत 42 धावा केल्या.
हैदराबादकडून टी नटराजन, खलिल अहमद व राशिद खानने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
…पण सरकार बुडणाऱ्या जहाजाची छिद्रं बुजवतंय; रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य; म्हणाले…
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट; राजकीय चर्चेला उधाण
दीपिका पादुकोणने दिली कबुली; म्हणाली…