मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आहे. या दोन नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील हयात हॉटेलमध्ये ही भेट झाल्याचं समजतं आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टी.व्ही. 9 शी बोलत होते.
राजकीय क्षेत्रात भिन्न विचारांचे भिन्न पक्षाचे लोक असे अधूनमधून भेटत असतात. पण त्यातून काहीतरी बातमी निर्माण होईल, असं नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
गेल्या 9 महिन्यांमध्ये सरकार जाणार अशी चर्चा सुरु आहे. पण देवेंद्र फडणवीस, मी किंवा आमचे कुठलेच नेते हे सरकार पडेल, असं म्हणाले नाहीत. हे सरकार जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत नाही. पण हे सरकार अंतर्गत विरोधांमुळे पडेल, असं सर्वसामान्य जनता म्हणत आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, हे सरकार पडेल तेव्हा पडेल. पण आम्ही त्यात कोणतीही भूमिका बजावणार नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट; राजकीय चर्चेला उधाण
दीपिका पादुकोणने दिली कबुली; म्हणाली…
“अभिनेत्री सारा अली खानदेखील एनसीबीच्या झोनल कार्यालयात दाखल”