कोथरुडमध्ये मंगळागौर कार्यक्रम संपन्न; मिनल धनवटे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

0
14

पुणे : कोथरूड येथील भुसारी कॉलनी परिसरात श्रावण महिन्यानिमित्त मंगळागौर सादरीकरण आणि श्रावणी गीत बहार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महिला आघाडी कोथरुड विधानसभा प्रमुख मीनल धनवटे व निलेश धनवटे यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटन महाराष्ट्र नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात श्रावण महिन्याचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले.

पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, युवासेना सरचिटणीस अनिकेत जवळकर, श्रद्धा शिंदे, नितीन पवार, सुदर्शनाताई त्रिगुणाईत, राजेश पळसकर, युवासेना महानगर प्रमुख सुप्रिया पाटेकर, प्रणव मेहता उपविभाग प्रमुख, आनंद भिलारे, नारायण पडवळ, श्रद्धा वाडेकर, शैलेश वाडेकर, उमा सोवनी, रेणुका मदार, प्रियांका चव्हाण मयुर पानसरे विभाग प्रमुख, विराज डाकवे विभाग प्रमुख, प्रणव थोरात विभाग प्रमुख, राजू गोखले, किरण मारणे, रोहित मारणे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here