Home महाराष्ट्र “शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केलं असतं तर अधिक बरं वाटलं असतं”

“शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केलं असतं तर अधिक बरं वाटलं असतं”

मुंबई : राज्यसभेत कृषी विधेयकावरुन गदारोळ घालणाऱ्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक दिवसांसाठी अन्नत्याग करत असल्याचं जाहीर केलं होतं. यावरुन भाजप नेते विनोद तावडे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केलं असतं, तर अधिक बरं वाटलं असतं, असं म्हणत विनोद तावडेंनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. टीव्ही 9 या वृत्तसंस्थेने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

शरद पवार स्वतः कृषिमंत्री होते. त्यांना जर कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्त्या सुचवायच्या असत्या, तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचे होते, शेतकरी हिताच्या दुरुस्त्या नक्कीच सरकारने स्वीकारल्या असत्या. पण शरद पवार यांच्यासारख्या माजी कृषिमंत्री आणि ज्येष्ठ नेत्याने केवळ विरोधासाठी विरोध करणे सामान्य शेतकऱ्याला पटलेले नाही, असं विनोद तावडेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपने टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं?; शिवसेनेचा भाजपला सवाल

शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्याचे प्रमुख म्हणून राज्याच्या कुटूंबाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही का?; चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

“किंग्स इलेव्हन पंजाबचा राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरवर दणदणीत विजय”