Home महाराष्ट्र भाजपने टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं?; शिवसेनेचा भाजपला सवाल

भाजपने टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं?; शिवसेनेचा भाजपला सवाल

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या टोल दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आता वाढीव बोजा पडणार आहे, अशी भाजपने शिवसेनेवर टीका केली होती. भाजपच्या या टीकेला शिवसेना नेते आणि आमदार सुनील प्रभू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते टिव्ही 9 मराठीशी बोलत होते.

संपूर्ण राज्यात टोल मुक्तीचं आश्वासन भाजपनं दिलं होतं त्याचं काय झालं हे त्यांनी आधी जाहीर करावं. तर मुंबई आणि पुणे टोलनाके का बंद केले नाहीत याचं उत्तर त्यांनी द्यावं, असा सवाल सुनील प्रभू यांनी भाजपला केला आहे.

दरम्यान, 2002 साली जे सरकार होतं त्यांनी करार केला होता. त्यानुसार दर 3 वर्षांनी टोल दरवाढ होईल. त्यामुळे करारानुसार टोलवाढ झाली आहे. सध्या दरवाढ झाल्यानंतर 2023 आणि त्यानंतर 2026 ला टोलदर होईल. त्यामुळे करारनुसार पैसे वाढले आहेत. त्यामुळे कुणीही राजकारण करू नये, असंही सुनिल प्रभू यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्याचे प्रमुख म्हणून राज्याच्या कुटूंबाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही का?; चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

“किंग्स इलेव्हन पंजाबचा राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरवर दणदणीत विजय”

अति तिथे माती.. शिवसेनेचा अंत जवळ आलाय; निलेश राणेंची शिवसेनेवर टीका