Home क्रीडा के.एल. राहूलचे शतक; पंजाबचे राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरसमाेर 207 धावांचे लक्ष्य

के.एल. राहूलचे शतक; पंजाबचे राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरसमाेर 207 धावांचे लक्ष्य

दुबई : आयपीएलचा आजचा सामना विराट कोहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध के.एल. राहूलच्या किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात होत आहे. राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकून किंग्स इलेव्हन पंजाब ला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय दिला आहे.

किंग्स इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी गमावत 206 धावा केल्या. पंजाबकडून कर्णधार राहूलने शतक ठोकताना 69 चेंडूत 132 धावा केल्या. ज्यात त्याने 14 चाैकार व 7 षटकार मारले. तर मयंक अगरवालने 26, निकोलस पूरनने 17, तर शेवटी करूण नायरने 8 चेंडूत 15 धावा केल्या. राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून शिवम दुबेने 4 षटकात 33 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तर युजवेंद्र चहलने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

…अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील; रावसाहेब दानवेंचा सरकारला इशारा

विनायक राऊतांना शिवसेनेत काडीची किंमत नसल्यामुळे जगामध्ये कोणालाच किंमत नाही असं त्यांना वाटतं- निलेश राणे

“शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण”

राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने टाॅस जिंंकला, प्रथम फिल्डींग करण्याचा घेतला निर्णय