मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा देत एक दिवसाचे अन्नत्याग करत असल्याचं जाहीर केलं. यावर . माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते
शरद पवारांनी पत्रकार परिषदेत विधेयकाला कुठेही विरोध केलेला नाही. त्यांनी काल जी कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईच्या निमित्ताने विरोधी पक्षाला समर्थन दिलं. पण मला असं वाटतं की राज्यसभेतील सदस्य असंशोभनीय वागले नसते तर आज पवार साहेबांना उपवास घोषित करावा लागला नसता. त्यांचं वागणं अशोभनीयच होतं. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, राज्यसभेच्या उपसभापतींची भूमिका सदनाच्या प्रतिष्ठेची आणि त्या पदाचा प्रचंड अवमूल्यन करणारी आहे अशी टीका करत शरद पवारांनी एक दिवसाचा अन्नत्याग केला.
महत्वाच्या घडामोडी-
99 टक्के शिवसैनिकांना संजय राऊत खटकतात- निलेश राणे
मराठा आरक्षणावरून शरद पवारांनी सोडलं माैन; म्हणाले…
धनगर आरक्षणासाठी शुक्रवारी राज्यभरात आंदोलन; पंढरपुरात ढोल वाजवणार- गोपीचंद पडळकर
जिम, रेस्टाॅरंट सुरू करा; रोहित पवार यांची राज्य सरकारला विनंती