मुंबई : मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यानंतर अनेकांनी सरकारला धारेवर धरलं होत. विरोधी पक्षाने तर मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या विषयावर भाष्य केलं.
मराठा आरक्षण घेण्याचा निर्णय एकमताने घेतला होता. गेले 2-3 दिवस मराठा आरक्षणावरून बैठक सुरू आहे. तसेच राज्य सरकारने विनंती याचिका कोर्टात दाखल केली असून मराठा आरक्षणवर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
धनगर आरक्षणासाठी शुक्रवारी राज्यभरात आंदोलन; पंढरपुरात ढोल वाजवणार- गोपीचंद पडळकर
जिम, रेस्टाॅरंट सुरू करा; रोहित पवार यांची राज्य सरकारला विनंती
“सविनय कायदेभंग प्रकरणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह तिघांना अटक”
“ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन”