सांगली : मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असतानाच धनगर समाज देखील पुन्हा आरक्षणची मागणी करू लागला आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीवरून धनगर समाज आता आक्रमक झाला असून या संदर्भात धनगर समाजाचे नेते व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमधून राज्य सरकार विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे.
शुक्रवार 25 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी ढोल बजाओ, सरकार जगाओ आंदोलनाची घोषणा गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत आयोजित केली होती यावेळी गोपीचंद पडळकरांनी या आंदोलनाची घोषणा केली आहे.
तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा सुरुवात झाली असून 25 सप्टेंबर रोजी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर स्वतः ढोल वाजवत सरकार विरोधात हे आंदोलन करणार असल्याचं पडळकर यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनाही आपण पत्र पाठवून तातडीने आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्याची मागणी केली होती. मात्र सरकारकडून धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत दुजाभाव होत आहे, त्यामुळे आता समाजाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
जिम, रेस्टाॅरंट सुरू करा; रोहित पवार यांची राज्य सरकारला विनंती
“सविनय कायदेभंग प्रकरणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह तिघांना अटक”
“ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन”
“राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचा सनरायझर्स हैदराबादवर रोमहर्षक विजय “