मुंबई : मराठा समाजातीलचं खूप मोठमोठ्या नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं वाटतं, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं, त्यावर मराठा आरक्षण कुणाला नकोय? चंद्रकांतदादा ‘त्या’ नेत्यांची नावं जाहीर करा, अशी मागणी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
मराठा आरक्षण कुणला नकोय? त्यांची नावं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली पाहिजे. रोज मतमतांतरे होण्यापेक्षा सकल मराठा समाजाचा एकच आवाज आला पाहिजे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.
दरम्यान, रोज वेगवेगळी विधाने करून गोंधळ निर्माण केला जात आहे, असंही अशोक चव्हाण म्हणले.
महत्वाच्या घडामोडी-
“मराठा समाजातील मोठ्या नेत्यांना वाटतं की समाजाला कधी आरक्षण मिळू नये”
शिवसेना हा अत्यंत कन्फ्युज पक्ष; देवेंद्र फडणवीसांची टीका
धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा…; गोपीचंद पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अनुराग कश्यपला अटक करा; कंगणा रणाैतची मागणी