दुबई : आयपीएलचा तिसरा सामना आज सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध राॅयल चैलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला गेलेला सामना राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने हैदराबादचा 10 धावांनी पराभव केला.
हैदराबाद टाॅस जिंकून बेंगलोरला प्रथम फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. बेंगलोरने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 163 धावा केल्या. बंगळुरुकडून सर्वाधिक 56 धावा सलामीवीर दिपक पडीक्कलने केल्या. त्यानंतर एबीडी व्हिलियर्सने धमाकेदार 51 धावा केल्या. फिंचने 27 धावा केल्या. हैदराबादकडून टी नटराजन, विजय शंकर आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरूवात चांगली नाही झाली. डेव्हिड वाॅर्नर केवळ 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर मनिष पांडे व जाॅनी बेअरस्टो यांनी डाव सावरला. दोघांनी 12 व्या षटकात धावसंख्या 89 वर नेली. आणि हैदराबाद विजयाच्या जवळ जात असतानाच मनीष पांडे आऊट झाला. मनीष पांडेने 33 चेंडूत 34 धावांचे याेगदान दिले. तर जाॅनी बेअरस्टोने 43 चेंडूत 61 धावा केल्या. ज्यात त्याने 6 चाैकार व 2 षटकार मारले. नंतर नियमित अंतराने विकेट्स गेल्याने हैदराबाद विजयापर्यंत पोहचू शकला नाही.
दरम्यान, बेंगलोरकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर नवदीप सैनीने 2, शिवम दुबेने 2 विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या घडामोडी-
मराठा आरक्षण कुणाला नकोय?, त्यांची नावं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली पाहिजे- अशोक चव्हाण
शिवसेना हा अत्यंत कन्फ्युज पक्ष; देवेंद्र फडणवीसांची टीका
धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा…; गोपीचंद पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अनुराग कश्यपला अटक करा; कंगणा रणाैतची मागणी