कोल्हापूर : मराठा समाजातीलचं खूप मोठमोठ्या नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं वाटतं, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते कोल्हापूरमध्ये येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी हा आरोप गेले अनेक वर्षे करतोय, मागील आठवड्यातही वारंवार केला आहे की, मराठा समाजातीलचं खूप मोठमोठ्या नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं वाटतं. त्यामुळे 15 वर्षे संपूर्ण बहुमाताचे सरकार असतानाही काँग्रेसने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजाचे प्रश्न सोडवावे असे राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीला वाटत असेल, तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 1500 कोटी रुपयांची मंजुरी द्यावी. मात्र असे काही न करता मराठा समाजाचे आंदोलन दडपून काढण्याच्या दृष्टीने 144 कलम लागू करून आरक्षणाचे चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडीवर टीका केली.
महत्वाच्या घडामोडी-
शिवसेना हा अत्यंत कन्फ्युज पक्ष; देवेंद्र फडणवीसांची टीका
धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा…; गोपीचंद पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अनुराग कश्यपला अटक करा; कंगणा रणाैतची मागणी
‘ही’ सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा