Home महाराष्ट्र गृहमंत्रीपदासाठी अजित दादा योग्य, राष्ट्रवादीत लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार; भाजपच्या ‘या’...

गृहमंत्रीपदासाठी अजित दादा योग्य, राष्ट्रवादीत लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा दावा

504

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पुण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना आपली नाराजी बोलावून दाखविली होती.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मी अनेकदा आपल्या वरिष्ठांकडे गृहमंत्रिपद मागितलं होतं. पण वरिष्ठांनी दिलं नाही, त्यांना वाटतं याला गृहमंत्रिपद दिल्यावर हा आपलंही ऐकणार नाही. आपल्या मनाचंच करणार, अशी नाराजी अजित पवार यांनी बोलावून दाखविली होती. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत एक भाकित केलं आहे.

हे ही वाचा : वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो: मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

केवळ शिवसेनेमध्येच मतभेद नव्हते तर राष्ट्रवादीमध्येही अंतर्गत धुसफूस ही कायम आहे. सध्या सर्वकाही आलबेल असले तरी लवकरच मोठा राजकीय स्फोट होणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी यावेळी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीमधीलही अंतर्गत मतभेद जगजाहीर होणार आहे. सध्या राष्ट्रवादीत सर्व काही व्यवस्थित दिसत असले तरी नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. योग्य वेळ आल्यावर राष्ट्र्वादीतही राजकीय ब्लास्ट होईल, असा दावाही बावनकुळेंनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मोठी बातमी! एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार?; खुद्द एकनाथ खडसेंनी केला खुलासा, म्हणाले…

उद्धव ठाकरेंची यशस्वी खेळी; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना, त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा, म्हणून केली नव्हती तर…; शिंदे गटातील ‘या’ मोठ्या नेत्यानं उद्धव ठाकरेंना फटकारलं