Home महाराष्ट्र धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा…; गोपीचंद पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा…; गोपीचंद पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सांगली : मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असताना धनगर समाज देखील पुन्हा आरक्षणची मागणी करू लागला आहे. या संदर्भात धनगर समाजाचे नेते व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.

महाराष्ट्रातील धनगड आणि धनगर एकच आहेत, असा अध्यादेश काढावा. सर्व धनगर समाजाला एसटीचे दाखले ध्यावेत. 2019-20 या वर्षासाठी 1000 कोटी व तेथून पुढे प्रत्येक वर्षी जे आदिवासींना तेच धनगरांना हे ठरल्याप्रमाणे 2020-21 या वर्षात आदिवासींना 8853 कोटी मंजूर करण्यात आले आहेत . तितकाच निधी धनगर समाजाला द्यावा ,अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी पत्रात केली आहे.

दरम्यान, कोरोनामुळं धनगर समाज शांत आहे, पण तो झोपला नाही. हक्कासाठी धनगर समाज पुन्हा तीव्र संघर्ष करणार आहे. एसटी आरक्षणासाठी तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा धनगर समाज आणि सरकार हा संघर्ष अटळ आहे, अशी ही भूमिका गोपीचंद पडळकर यांनी पत्रातून केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

संपूर्ण महाराष्ट्र ढासळतोय, पण सरकार माझ्याशी वाद घालण्यात मग्न- कंगणा रणाैत

मनसेचा सविनय कायदेभंग; संदीप देशपांडेंनी केला लोकल प्रवास

“मराठा आरक्षण स्थगिती विरोधात आज सोलापूर बंदची हाक;” आंदोलकांकडून रस्त्यावर टायरची जाळपोळ

भिवंडीत 3 मजली इमारत कोसळली, 8 जणांचा मृत्यू; अनेक जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले