मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे तब्यतीच्या कारणास्तव लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. संजय राऊत यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी काँग्रेसचे नेत्यांनीही राऊतांची भेट घेतली.
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जेष्ठ काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे आणि विश्वजीत कदम यांनी आज संजय राऊत यांची लीलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
संजय राऊत यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अँज्युओप्लॅस्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या ते रुग्णालयात आहेत.
संजय राऊत यांनी भाजपविरोधात रोखठोक भूमिका मांडल्यामुळे शिवसेनेनं भाजपसोबत काडीमोड घेतली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत सत्तास्थापनेसाठी पक्षाची तयारी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर आघाडीचे नेत्यांनी राऊतांची भेट घेतली आहे.