सोलापूर : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षण स्थगिती विरोधात आज बंद पुकारण्यात आला आहे.
सोलापुरात आज सकाळपासूनच बंदला सुरुवात झाली आहे. माढ्यात तर रस्त्यावर टायर जाळून मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून सोलापुरात एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच सोलापूर शहरात पोलीस बळ मोठ्या प्रमाणावर तैनात आहे.
सोलापुर जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर देखील आंदोलनं करण्यात येणार आहेत. शहरात आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर आंदोलनासाठी कार्यकर्ते एकत्रित जमणार आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
भिवंडीत 3 मजली इमारत कोसळली, 8 जणांचा मृत्यू; अनेक जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले
कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल
किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना टाय; सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा विजय
उद्धवजी, आतातरी जनतेची दिशाभूल करणं सोडा- चंद्रकांत पाटील