Home महाराष्ट्र उद्धवजी, आतातरी जनतेची दिशाभूल करणं सोडा- चंद्रकांत पाटील

उद्धवजी, आतातरी जनतेची दिशाभूल करणं सोडा- चंद्रकांत पाटील

मुंबई : जनसंपर्कासाठी नियुक्त केलेल्या खासगी संस्थेच्या टेंडरवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

महाराष्ट्र शासनाने एका खासगी संस्थेला स्वतःच्या जनसंपर्कासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी काही दिवसांपूर्वी सुमारे 6 कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. राज्य सरकारला असे वाटते की जनतेचा त्यांच्याविषयी असलेला दृष्टिकोन बदलण्यात त्या संस्थेने मदत करावी. म्हणजे ही सरळ सरळ जनतेची दिशाभूल करुन त्यांना चुकीच्या दिशेने नेण्यास परावृत्त करण्याचा प्रकार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, जनसंपर्कासाठी खर्च केलेल्या 6 कोटी रुपयांमध्ये 25 ते 30 हजार लोकांच्या कोरोना चाचण्या झाल्या असत्या. हा विचार राज्य सरकारने करायला हवा होता. उद्धवजी, तुमची प्रतिमा चांगली वाईट कशीही असो, या कठीण काळात कमीत कमी महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होणार नाही याची तरी काळजी घ्या, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अनुराग कश्यपला अटक करा; कंगणा रणाैतची मागणी

‘ही’ सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

“दिल्ली कॅपिटल्सचे किंग्स इलेव्हन पंजाबसमोर 158 धावांचे लक्ष्य”

सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना अटक करा, त्यांची नावे जाहीर करा- प्रकाश आंबेडकर