Home क्रीडा किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना टाय; सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा...

किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना टाय; सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा विजय

दुबई : आयपीएलचा दुसरा टी-20 सामना किंग्ज इलेव्हन पंजाब व दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला दुसरा सामना सुपर ओव्हरमध्ये रंगला गेला. यात दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 10 विकेट राखून पराभव केला.

आज किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स  सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार के.एल.राहूलने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 गडी बाद 157 धावा केल्या आहेत. दिल्लीकडून मार्कस स्टाॅयनिसने 21 चेंडूत 53 धावा, श्रेयस अय्यरने 39 धावा, रिषभ पंतने 31 धावा केल्या. तर पंजाबकडून मोहम्मद शमीने 15 धावा देत 3 गडी बाद केले. तर शेल्डन काॅट्रेलने 2, तर रवी बिष्णाेईने 1 गडी बाद केला.

दरम्यान, 158 धावांचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबची सुरूवात चांगली नाही झाली. त्यांच्या 5 विकेट्स केवळ 55 धावात बाद झाल्या होत्या. मात्र मयंक अगरवालने एक बाजू लावून धरत पंजाबला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले मात्र शेवटच्या षटकात मयंक आऊट झाला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. मयंकने 60 चेंडूत 89 धावा केल्या. ज्यात त्याने 7 चाैकार व 4 षटकार लगावले. दिल्लीकडून अश्विन व रबाडाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

किंग्ज इलेव्हन पंजाबने सुपर ओव्हरमध्ये केवळ 2 धावा केल्या. रबाडाने केवळ 3 चेंडूत 2 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. दिल्लीने हे लक्ष्य केवळ 2 चेंडूतच पूर्ण केले.

महत्वाच्या घडामोडी-

उद्धवजी, आतातरी जनतेची दिशाभूल करणं सोडा- चंद्रकांत पाटील

अनुराग कश्यपला अटक करा; कंगणा रणाैतची मागणी

‘ही’ सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी आहे; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

“दिल्ली कॅपिटल्सचे किंग्स इलेव्हन पंजाबसमोर 158 धावांचे लक्ष्य”