पुणे : राज्यातील काही पोलीस अधिकारी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत होते, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका ऑनलाईन वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावर वंचित वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्का तसेच एनआयए अंतर्गत अटक झाली पाहिजे. अनिल देशमुख यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावी, अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
दरम्यान, या सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आता अनिल देशमुख यांच्या कोर्टात चेंडू असून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
ऑडिट बिलांचेच नव्हे तर डॉक्टरांचेही करण्याची गरज- जयंत पाटील
“अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न”
“मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनामुक्त”